थोडा उशीर झाला असता तर दगावले असते; गौतमी पाटीलच्या वडिलांची बिकट अवस्था
1772 views
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वराज्य फौंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी एका बेवारस, खंगलेल्या अवस्थेतील व्यक्तीला उपचारासाठी आणलं. मात्र यावेळी दुर्गेश चव्हाण यांना दाखल केलेला व्यक्ती कोण आहे हे माहित नव्हते, सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी मेसेज व्हायरल केल्यानंतर आणि दाखल केलेल्या त्या व्यक्तीकडील आधार कार्डच्या आधारावरून त्याची ओळख पटली आहे. या व्यक्तीचं नाव रवींद्र पाटील असून आपल्या नृत्यामुळे संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे ते वडील असल्याचं समोर आलंय.