मुलीच्या जन्मानंतर नाकं मुरडणाऱ्यांनो, लेकीचं स्वागत असं कराचयं असतं...!
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडणारी अनेक कुटुंबाची याआधीही तुम्ही पाहिली असतील. पण धुळ्यातील एका दाम्पत्याने कन्यारत्नाचे दणक्यात स्वागत करत गावासमोर एक आदर्श निर्माण केलाय. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दबाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदिनी पाटील... त्यांना चार वर्षांची पहिली मुलगी आहे. अन दुसऱ्यांदाही पाटील दाम्पत्याला कन्यारत्न जन्माला आले....नुसत्या थाटामाटात फक्त स्वागत न करता हा आनंद त्यांनी गावकऱ्यांसोबतही साजरा केलाय. पाटील दाम्पत्याने चक्क गावातील घरपट्टी अन् पाणीपट्टी भरणाऱ्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांची २० टक्के रक्कम भरण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक कुटुंबीयांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत असते. परंतु या या अनोख्या पद्धतीने कन्यारत्न जन्माचे स्वागत केल्याने संपूर्ण धुळे जिल्हातून सरपंच नंदिनी पाटील दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.