Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
माझ्या बाबाला घरी परत पाठवा, शेतकऱ्याच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
'सर माझे बाबा देवाच्या घरी गेल्याचे माझी आजी मला सांगतेय सर मला देवाच्या घरचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला घरी परत पाठवा' हे शब्द आहेत एका चिमुकलीचे अशी भावनिक विनवणी करणार पत्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या शेगाव खोडके येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुकल्यां मुलीचं. या चिमुकलीनं चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत आपली भावनिक साद घातलीय हे पत्र सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरतंय.शेगाव खोडके येथील शेतकरी नारायण खोडके यांनी पिकाला योग्य भाव मिळत नसल्यान व अवेळी पाऊस त्यातच कर्जाचा डोंगर पेरलेल्या पिकांना देखील अनेक रोगाचा फटका नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आपलं जीवन संपवलय..मात्र आत्महत्या केल्यानं त्यांच्या परिवारावर अजूनच दुःख वाढलंय. इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी किरण खोडके हिन मुख्यमंत्री शिंदे यांनाच पत्र पाठवलंय.