अजितदादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली, अनिल पाटील अमळनेरला गेले, स्वागतासाठी शाळकरी पोरांना रोडवर बसवलं
1172 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दुतर्फा बसवण्यात आलं होतं. कॅबिनेट मंत्री अनिल पाटलांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रोडवर बसवलं. यावेळी विद्यार्थी मंत्र्यांची वाट पाहत रस्त्यावरच दुतर्फा उन्हात बसले होते. एका रोटरी क्लबच्या वतीने मंत्र्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही आश्रमशाळा भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांची शैक्षणिक संस्था असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जातेय.