एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या पॅनलचा विजय
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
भाजप शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत भुसावळ बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. हा विजय मिळवल्यानंतर भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळालं. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला. गेल्या काळात भुसावळ बाजार समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. यंदाच्या निवडणुकीत बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने त्यांचा झेंडा फडकवला.