शेतकऱ्यांना खत, रेशन कार्ड मिळेना; गुलाबरावांकडून अधिकाऱ्याची कान उघडणी
1057 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशेतकऱ्यांना खत, नागरिकांना रेशन कार्ड मिळत नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच संतप्त झाल्याचा पाहायला मिळालं.फोन वरून अधिकाऱ्याची कान उघडणी करताना गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्याला झापलं.धरणगावात महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थिती होते.यावेळी शेतकऱ्यांनी शेतीचे मशागतीचे दिवस आहे, मात्र खते उपलब्ध नसल्याचे सांगितले..या तक्रारीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचा रागाचा भडका उडाला.त्यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फोन लावून त्यांची कान उघडणी केली.लोकांच्या समस्या तातडीने सोडवा, अशा सूचना सुद्धा यावेळी गुलाबरावांनी अधिकाऱ्यांना दिल्या.