अजितदादांची खंबीर साथ; जळगावात भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी पॅनल मविआ विरोधात मैदानात
1740 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करागेल्या आठवड्याभरापासून चर्चा झाली ती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची... अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ४० आमदारही जाणार असल्याचं बोललं खरं... पण पत्रकार परिषद घेऊन अजितदादांनी चर्चांना पूर्णविराम दिलेला असला तरी ते आता पुन्हा चर्चेत आलेत ते शिंदे-फडणवीसांसोबत फोटोमध्ये झळकल्या बॅनरमुळे.... हे बॅनर आहेत जळगाव जिल्ह्यातील... जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपासोबत संजय पवार यांचा राष्ट्रवादी गटही महाविकास आघाडी विरोधात निवडणूक लढवणार आहे. यासाठीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांचा फोटो झळकलेला पाहायला मिळतोय.