दिल्लीतील जे.पी नड्डा यांची भेट ते स्वगृही भाजपात पतरण्याची तारीख, एकनाथ खडसेंकडून मोठा खुलासा
1060 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्याने चर्चा सुरु होत्या. या चर्चांनंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चांवर मोठा खुलासा केला आहे.खडसे म्हणाले, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला बोलावतील त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल.