अधिकृत दौरा निश्चित होण्यापूर्वीच जळगावात नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी सुरू
1062 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करापंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात ५ किंवा 12 फेब्रुवारी रोजी संभाव्य दौरा करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.अद्याप शासनाकडून कुठलाही शासकीय दौरा निश्चित झालेला नाही.नरेंद्र मोदी यांची सभा कुसुंबा येथील विमानतळा समोरील 40 एकरच्या इंडस्ट्रियल पार्कमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जमिनीच्या सपाटी करण्याचे काम जय्यत तयारीवर सुरू करण्यात आले आहे.40 एकरच्या जमिनीचे सपाटीचे करण्याचे काम 26 जानेवारी पासून सुरू झाले आहे.या ठिकाणी रात्रंदिवस सहा जेसीबी पाच ट्रॅक्टर दोन रोलर या साधनाने सपाटीकरण सुरू केले आहे. तसेच सभामंडपाचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे.