कार्यकर्त्यासोबत खडाजंगीच्या व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाल्या रक्षा खडसे?
1118 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.या व्हिडिओत कार्यकर्ते रक्षा खडसेंवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.या व्हायरल व्हिडिओवर रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.जिथे जे उपस्थित होते त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला आहे असं रक्षा खडसे म्हणाल्या.कोअर कमिटीमधील व्हिडिओ बाहेर व्हायरल करणे हे चुकीचे आहे असं रक्षा खडसेंनी सांगितलं.व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे याबाबत पक्ष नक्कीच विचारणा करेल असंही खडसे म्हणाल्या.