रावेर लोकसभेचा उमेदवार ठरला, दिड महिन्यापूर्वी भाजप सोडून आलेले श्रीराम पाटील रक्षा खडसेंविरोधात निवडणूक लढणार
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
श्रीराम पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. ते रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या श्रीराम पाटलांसमोर रक्षा खडसे यांचं आव्हान असेल. दिड महिन्यापूर्वीच श्रीराम पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता.