स्मिताताईंना त्यांची मुलगी आहे सांभाळून घ्यायला, पण माझी परिस्थिती सर्वांना माहितीये : रक्षा खडसे
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रक्षा खडसे यांनी पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. रक्षा खडसे प्रचारदम्यान एका सभेत बोलताना मतदारांना आवाहन करताना पाहायला मिळाल्या. त्या म्हणाल्या, सासर नसले तर भाजप पक्ष माझे माहेर आहे, त्यामुळे पक्षाने माझ्या पाठीमागे उभं राहावं. स्मिता ताईंना म्हटलं तुमची मुलगी आहे घरी सगळं सांभाळायला, पण आता माझी परिस्थिती सर्वांना माहित आहे. आता माझी जबाबदारी पक्षालाच घ्यावी लागणार आहे, घरची सदस्य म्हणून, असंही त्या म्हणाल्या. पक्षाने एक लहान मुलगी म्हणून मला सांभाळले आहे, आताही सांभाळून घ्या, असंही आवाहन केलं. मध्ये अचानक परिस्थिती बदलली, परिस्थिती बदलली असली तरी पक्ष माझ्यामागे खंबीरपणे उभा आहे.