जळगावचे वीर जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी निरोप
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अमर रहे…अमर रहे…च्या घोषात आज (१९ नोव्हेंबर) जळगावच्या धरणगावचे वीर जवान विनोद शिंदे पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी जवान विनोद पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने वीर जवान विनोद पाटलांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, शहीद जवानाची वार्ता रोटवदला धडकताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली होती. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन, तर मुलगा आदित्यने वडिलांना मुखाग्नी दिला.