जालन्यातील कंत्राटदारांचा भोंगळ कारभार; रस्त्यावर पॉलिथीन अंथरूण डांबरीकरण, ग्रामस्थांकडून पोलखोल!
1289 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराया व्हिडीओत तुम्हाला दिसत असेल की हा रस्ता कसा अलगद चादरी सारखा निघतोय. रस्त्याच्या बोगस कामाचा व्हिडीओ ग्रामस्थांनीच व्हायरल केला आहे. जालनाच्या अंबड तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबड तालुक्यातील हस्तपोखरी कर्जत या रोडच्या डांबरीकरणाचं काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलं होतं. या रोडच्या कामात कंत्राटदारांनी चक्क डांबरीकरणाच्या खाली पॉलिथिन पन्नीचा वापर करून त्यावर डांबरीकरण करून पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामाला हरताळ फासला आहे. पॉलिथिन पन्नीचा वापर केल्याने रस्ता अक्षरशः चादरीसारखा बाहेर निघाला आहे. गावोगावी आणि खेड्यापाड्यात लोकांना चालण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्ता हवा होता. कंत्राटदारानं झटपट काम संपवून टाकलं. त्यामुळे गावकऱ्यांनी जेव्हा या रस्त्याची पाहाणी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्यामुळे संपूर्ण कामाची चौकशी करून दोशी गुत्तेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे