तरुणानं बनवली अॅक्सिडेंट अलर्ट सिस्टम; अपघाताची सूचना अन् लोकेशन थेट नातेवाईकांसह रुग्णवाहिकेला
1063 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएखाद्याचा अपघात झाला तर त्याला मदत मिळेपर्यंत फार वेळ उलटून जातो. एवढंच नाही तर, दुचाकीस्वाराला सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट सोडले तर कुठलीच ठोस उपाय योजना अस्तित्वात नाही. पण यावरच उपाय शोधून काढला जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील राजेंद्र पाचफुले या युवकानं. राजेंद्रनं असं भन्नाट डिव्हाइस शोधून काढलं की ज्यामुळे अपघाताचं लोकेशन थेट नातेवाई, पोलीस आणि रुग्णवाहिकेला मिळणार. डिव्हाइस किट दुचाकीला लावल्यानंतर अपघात झाल्यास ताबडतोब रुग्णवाहिका, पोलीस,आणि संबंधितांच्या नातेवाईकांना घटनास्थळाचे लोकेशन मिळणार आहे.