जानकरांच्या नावाची चर्चा, परभणीतून भाजपनं लढावं; बबनराव लोणीकरांची मागणी
1325 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरभणी लोकसभेची जागा ही भाजपने लढवावी असं बबनराव लोणीकरांनी मागणी केली.हा निर्णय चुकला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छातीवर बसेल असं लोणीकर म्हणाले.परभणी लोकसभेमध्ये भाजप सक्षम असून भाजप या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतो असे लोणीकर यांनी म्हटलं आहे.दरम्यान आपल्या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.काही दिवसापासून रासपचे महादेव जानकर यांना महायुतीमधून ही जागा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान या जागेसाठी बबनराव लोणीकर यांचे पुत्र युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर हे इच्छुक आहेत.