बबनराव लोणीकर आणि सतीश टोपेंच्या घरावरील दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज समोर; जालन्यातील धक्कादायक प्रकार
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर समोरा समोर आले. शनिवारी म्हणजे २ डिसेंबर रोजी यावरून जालन्यात प्रकरण चिघळल्याचं पाहायला मिळालं. दुपारी राजेश टोपेंची गाडी फोडण्यात आली तर संध्याकाळी बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक झाली, तर राजेश टोपेंचे बंधू सतीश टोपेंच्याही घरावर दगडफेक झाली. या प्रकरणी टोपे आणि लोणीकर दोघांनीही एकमेकांवर आरोप केले. दरम्यान, आता या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय पहिल्या फुटेजमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक करत असल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या दृश्यात राजेश टोपेंचे बंधू सतीश टोपेंच्या घरावर देखील दगडफेक झाल्याचं दिसून आलं असून घरामध्ये खिडक्यातून आलेले दगड पाहायला मिळत आहेत.