लोकांनी थेट हाताने उचलला रस्ता, व्हिडिओ व्हायरल होताच केंद्राचं पथक तपासणीसाठी घटनास्थळी!
1043 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करानुकताच बांधण्यात आलेला रस्ता लोकांनी थेट हाताने उचलतानाच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा झाली. जालन्यातील कर्जत हस्तपोखरी या रस्त्याच्या कामाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ही बातमी सोशल मीडियासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. अखेर या बातमीची दखल केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पथकानं थेट कर्जत हस्तपोखरी रस्त्याची पाहणी सुरु केली आहे. त्यामुळे या पाहणीतून काय निष्कर्ष समोर येतो याकडे आता सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. या रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा झाली आहे.