आई-बापाचं निसर्गप्रेम; लेकीची बीज तुला, चार जिल्ह्यांतून बिया जमवत वृक्षारोपण
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
निसर्गप्रेमी, गिर्यारोहक असलेले विनोद सुरडकर हे सातत्याने पर्यावरणपूरक उपक्रम राबवतात. शुक्रवारी त्यांची लेक वसुंधरा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी अशीच निसर्गप्रेमी शक्कल लढवली. दुर्मिळ, देशी वृक्षांच्या बियांनी बीज तुला करुन त्यांनी लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. लेकीचे वजन 11 किलो असले तरी त्यांनी यवतमाळ, वाशिम,बीड, सोलापूर या चार जिल्ह्यातून पर्यावरणप्रेमींच्या मदतीने 12 किलो वृक्षांच्या बिया या उपक्रमासाठी गोळा केल्या आहेत. विनोद व सपना सुरडकर या दाम्पत्याने लेकीच्या जन्मापासून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळेच लेकीचे नामकरण त्यांनी थेट कळसूबाई शिखरावर केले होतं आणि पहिला वाढदिवसही असा अनोखा साजरा केला. गेल्या चार महिन्यांपासून दाम्पत्य या अनोख्या संकल्पनेवर काम करत होतं. त्यासाठी त्यांनी स्वत: विविध ठिकाणी फिरुन देशी व दुर्मिळ वृक्षांच्या बिया संकलित केल्या. याशिवाय पर्यावरणप्रेमी मित्रांकडून त्यांनी बिया संकलित केल्या.