उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे आले पाहिजेत, जरांगे पाटलांच्या पाच मागण्या
1650 views
jalna चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी संघर्ष करत उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे नाव आज चर्चेत आहे.मनोज जरांगे यांचं २९ ऑगस्ट पासून उपोषण सुरु असून आज उपोषणाचा १५ वा दिवस आहे.आज त्यांनी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू पुन्हा एकदा सगळ्यांसमोर मांडली आहे.यावेळी जरांगे म्हणाले, जात बदनाम होऊ नये, म्हणून मी दोन पावले मागे हटत आहे.आतपर्यंत आपण ४० वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल.मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही, मी माझी जागा सोडणार नाही.महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे जरांगे यांनी सांगितले.