शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, अर्धा एकर उसावर माथेफिरुनं फिरवला ट्रॅक्टर
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील गोंदी येथे माथेफिरुने उसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. शेतकऱ्याचा तोडणीस आलेल्या अर्ध्या एकर उसाच्या पिकावर अज्ञात माथेफिरूने ट्रॅक्टर फिरवलाय.भिवराज दिनकर सोळुंके असं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऊस पिकाचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झालं आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलायया घटनेमुळे शेतकरी सोळुंके यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.