११ घोडे, ७५ जेसीबी आणि ११ क्विंटल फुलं; मनोज जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी
1164 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेचा पाचवा दौरा सुरु होत असून ते बदनापुरात सभा घेणार आहेत११ घोडे, छत्रपती शिवाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी राजे यांची वेशभूषेत कलाकार जरांगे यांचे स्वागत करणार आहेत.अकरा क्विंटल फुलांची ७५ जेसीबीमधून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.बदनापूर येथील विविध समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पाठिंबा आहे.आजच सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतलीय.या पार्श्वभूमीवर जरांगे या सभेत काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..