बिकट परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणासाठी झेप, जालन्याच्या मिस्बाहचा नीट परीक्षेत डंका
1023 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामागील वर्षी शिफा फिरदौस युसुफोद्दीन तर या वर्षी जालन्यातील पंक्चर काढण्याचे काम करणाऱ्याची मुलगी मिस्बाह अन्वर खान हिने गरीबीवर मात करत नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय. 720 पैकी 633 गुण घेत नावलौकिक मिळविला आहे.जालन्याच्या उर्दु हायस्कूलच्या या विद्यार्थीनीने शिफानंतर गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही तास अगोदर ऑनलाईन नीटचा निकाल जाहीर झाला,गरीबीवर मात करत मिस्बाहने हे यश संपादन केले असल्याचे मिस्बाहने सांगितले आहे. कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना रात्र दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. एमबीबीएस करून डॉक्टर बनण्याची तिची दृढ इच्छा आहे.डॉक्टर बनून तिला गोरगरीबांची सेवा करायची आहे.