सुरेख अन् ट्रेंडी राख्या,२५ वर्षांचा व्यवसाय;३० ते ३५ महिलांना रोजगार,दिवसाला प्रत्येकी ३०० राख्यांची निर्मिती
1154 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याला रेशमी बंधात बांधण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन...या दिवसांत बाजारात दिसणाऱ्या अत्यंत सुंदर, रंगीबेरंगी, ट्रेंडी राख्यांच्या निर्मितीसाठी असंख्य हात वर्षभर कष्ट घेत असतात...जालन्याचं परेवाल कुटुंबही असंच एक कुटुंब...गेल्या २५ वर्षांपासून राख्यांचा व्यवसाय करणारं हे कुटुंब इथल्या ग्राहकासाठी भलतंच स्पेशल आहे....परेवाल कुटुंबाच्या राख्यांची जालन्यात मोठी चलती आहे...अन् ह्यातून होतकरू महिलांना गेली अनेक वर्षे मिळणारा रोजगार हे ह्यांचं आणखी एक विशेष. खरंतर, आपल्याला बाजारात दरवर्षी असंख्य प्रकारच्या अन् ट्रेंडच्या राख्या दिसत असतात अन् परेवाल कुटुंबही हे सारे ट्रेंड्स फाॅलो करतात बरं का...आता यंदाचा ट्रेंड काय? ऐकापरेवाल कुटुंबाच्या या व्यवसायाने गेली २५ वर्षे अनेक महिलांच्या हाताला काम मिळतं अन् ग्राहकांच्या प्रचंड पसंतीमुळे असंख्य हातांनी वर्षभर घेतलेल्या कष्टांचं चीज होतं...काय मग तुम्हीही यंदाच्या ट्रेंडचीच राखी खरेदी करताय ना?