मराठा आंदोलनात जाळपोळ करणारे भिडेंचे कार्यकर्ते होते; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा गंभीर आरोप
1965 views
jalna चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आंदोलनात उद्रेक करणारे, जाळपोळ करणारे हे संभाजी भिडे गुरुजींचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजय लाखे पाटलांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी लाखे पाटलांनी केली. जालन्यात सोमवारी (४ ऑगस्ट) मराठा समन्वयकांची एक व्यापक बैठक झाली. आजपर्यंत मराठा समाजानं शांततेत मोर्चे काढले कधीच धुडगूस घातला नाही, आता बदनाम करण्यासाठी संभाजी भिडेंचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि उद्रेक केला असा आरोप लाखे पाटलांनी केला.