मनोज जरांगेंची प्रकृती ढासळल्याने गावकऱ्यांनी घेतली धाव, ओठाला पाणी लावत उपचार घेण्यासाठी आर्जव
1334 views
jalna चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती ढासळल्याचे पाहायला मिळालं. ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्याने गावकऱ्यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. जरांगे पाटलांच्या ओठाला पाणी लावत गावातील महिलांनी उपचार घेण्याची विनंती केली. सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांनी उपचार, तसेच पाणी घेण्यासाठी नकार दिला. मात्र, अनेक प्रयत्नांनंतर अखेर सलाईन लावून घेण्यास जरांगे पाटील तयार झाले.