मनोज जरांगे पाटलांवर १४० जेसीबींमधू दीड टन फुलांची उधळण, होम ग्राऊंडवर तयारी जोरात
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जालन्यात आज (१ डिसेंबर) होम ग्राउंडवरची मनोज जरांगे पाटलांची चौथ्या टप्प्यातील पहिली सभा होणार असून जरांगेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांवर १४० जेसीबींद्वारे दीड टन फुलांची उधळण होणार आहे. जरांगेंच्या स्वागतासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ही पुष्पवृष्टी होईल. तसेच, जरांगेंच्या स्वागतासाठी १०१ उखळी तोफा वाजविण्यात येणार असल्याचीही माहिती मिळते. जरांगेंसाठी १० क्विंटलचा शंभर फुटाचा हार देखील तयार करण्यात आला असून शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोटार सायकल रॅली देखील काढण्यात येणार आहे.