२४ दिवसांपासून ओबीसी बांधवांचं साखळी उपोषण, भुजबळांची उपोषण मागे घेण्याची विनंती
1041 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअंतरवाली सराटी पासून अगदी जवळ असलेल्या वडीगोद्रि येथे ओबीसी समाजाचे २४ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या आणि अशा मागण्यांसाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे.मंत्री छगन भुजबळ यांनी येथील उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना साखळी उपोषण मागे घेण्याची विनंती केली.यावेळी राष्ट्रीय ओबीसी सेल अध्यक्ष बबनराव तायवाडे हे देखील उपोषण स्थळी दाखल झाले.तायवाडे यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.