भाव वाढण्याची वाट पाहत कापूस घरातच ठेवला, पण पिसवांचा त्रास, अंगाला खाज, शेतकरी हैराण
1268 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला कायमच हतबलता येते. अनेक संकटांचा सामना करून शेतकरी पांढरं सोनं पिकवतो परंतु, माल हाती येताच बाजारातील दर घसरले तर हाती निराशाच येते आणि दुसरीकडे घरात कापसाची साठवणूक करावी तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कापसामुळे काय आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. साठवून ठेवलेल्या कापसात किडे, पिसवा होत असल्यानं अंगाला खाज सुटते. ग्रामीण भागात कापसामुळे त्वचारोग हेण्याचं प्रमाणही वाढलं आहे.