कोल्हापुरातील बहिरेश्वर गावातील अद्भुत नजारा, जणू पांढऱ्याशुभ्र कापसाची जमिनीवर चादर
1080 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामागील काही दिवसांपासून कोल्हापुरात थंडीचा पारा चांगलाच घसरला आहे.कालपासून तर दाट धुकेही पडत आहे.यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहेत.करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावातील डोंगरावरून तर आज नयनरम्य नजारा पाहायला मिळाला.पायथ्याचा संपूर्ण भाग पूर्णपणे धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळाले.निसर्गाच्या सौंदर्याचा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी अनेकजण या भागात गेले होते.ड्रोनच्या साहाय्याने टिपलेले हे विहंगम दृश्य खास महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या प्रेक्षकांसाठी...