कोल्हापूरच्या तरुणांवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मोदी स्टेडिअमवर लेझर शोची जबाबदारी
1103 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करायंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात होणार आहे. यंदा विश्वचषकाची हॅट्रिक करण्यासाठी भारतीय संघ आसुसला आहे.जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणाऱ्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम अहमदाबादेत या सामन्यादरम्यान कोल्हापूरच्या तरुणांकडून करण्यात येणारा लेसर शो व लाईट इफेक्टचे खास आकर्षण असणार आहे. सामन्यादरम्यान प्रेक्षकांना अधिक आनंद देण्यासाठी मैदानावर खास लेसर शो व लाईट इफेक्ट करण्यात येतात. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात अंधार पडल्यानंतर डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्र राहिली आहे, डिम शो व ग्राफिक शो सादर केला जातो. हाच शो कोल्हापूरचे तरुण अख्ख्या जगाला दाखवणार आहेत. कोल्हापूरचे अमित पाटील आणि रामकृष्ण वागराळे अशी या तरुणाची नावे आहेत. २०११ ला सुरू केलेल्या लाईटच्या व्यवसायात त्यांनी नवनवे तंत्रज्ञान स्वीकारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.