ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर अंबाबाई मंदिरात प्रवेश नाकारल्यानं पत्रकारांची निदर्शने
1134 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकरवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सवास १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होतोय.अंबाबाई मंदिरात पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना वृत्तांकनासाठी बंदी घालण्यात आली आहे.आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात अंबाबाई मंदिरासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. कलेक्टर गो बॅक..हुकूमशाही नही चलेगी.. जिल्हाधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी आज अंबाबाई मंदिर परिसर दुमदुमून गेलाय.आई अंबाबाई , दार उघड बये दार उघड, जिल्हाधिकाऱ्यांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आलीय.