संघटनेसाठी आयुष्याची माती केली, आता आवाज उठवायला हवा; भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची चंद्रकात दादांवर नाराजी!
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधीच भाजपमध्ये उभी फूट पाहायला मिळतंय.भाजपतील जुने विरुद्ध नवे कार्यकर्ते असा संघर्ष असल्याचं चित्र समोर येतंय.भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या नियुक्तींवरून जुने कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांमध्ये जुने विरुद्ध नवे असा संघर्ष आहे.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांच्यासह अनेक माजी तालुका अध्यक्ष भाजपच्या विरोधातच उभा राहिले आहेत.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सांगण्यावरूनच पदाधिकाऱ्यांना डावल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.