श्री अंबाबाई रुपातील कात्यायनी देवी; सोन्यासारखा वर्ण अन् भव्य रूप; देवीची रंजक आख्यायिका
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रूपातील डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे कात्यायनी देवीचं सुरेख रुप पाहा...कोल्हापूरच्या दक्षिणेला ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवात मोठा उत्साह असतो.तिन्ही लोकांत महिषासुराचे अत्याचार वाढले अन् कात्यायन ऋषींच्या कन्येच्या रूपात माता दुर्गा प्रकटली म्हणूनच तिचे नाव कात्यायनी असे पडले...शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीला कात्यायन ऋषींनी पूजन केल्यानंतर दशमीला कात्यायनी देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव झाले महिषासुरमर्दिनी..असं आख्यायिका सांगते...कात्यायनी देवीच्या आराधनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे...त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून लाखो भाविक मंदिरात दाखल होत असतात...करवीर खंडातील 'पद्मपुराणा'त उल्लेख असलेल्या कात्यायनी देवीचं महात्म्य फार मोठंय... कात्यायनी देवीचं हे अद्भुत रुप डोळे भरून पाहण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात संपूर्ण जिल्ह्यातून लाखो भाविक मंदिरात दाखल होत असतात.