१५ आंब्यांचा दर ३८००, दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा कोल्हापुरात दाखल
1115 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करादक्षिण आफ्रिकेतील मलावीतील हापूस आंबे कोल्हापूरमध्ये विक्रीसाठी आले आहेत.कोल्हापूरच्या मार्केट यार्डतील डी.एम बागवान यांच्या पेढीवर हे आंबे आले आहेत.सव्वा डझनच्या या आंब्यांच्या बॉक्सचा दर ३८०० रुपये आहे.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात कोकणचा हापूस बाजारपेठेत येतो.आता नोव्हेंबर महिन्यातच परदेशातील आंबे दाखल झालेत.रत्नागिरी आणि देवगड च्या हापूस आंब्यासारखीच या आफ्रिकन आंब्याची चव असते.आंबा शौकिनांसाठी ही एक पर्वणीच आहे. या आंब्याचा सिझन अवघे पंधरा दिवसच चालणार आहे.