हायवेवर राजू शेट्टींनी नऊ तास मुक्काम ठोकला, दिवस संपताच शेतकऱ्यांनी फुलं अन् गुलाल उधळत जल्लोष केला
1207 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करागेल्या आठ तासापासून सुरू असलेलं राजू शेट्टींचं राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन अखेर थांबलं आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी मागण्या मान्य केल्याने....स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाला आहे.मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे त्यांनी १०० रुपये...तर ३ हजार पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव...एकमताने मान्य करण्यात आला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर दोन महिन्यानंतर यश आल्याने....फटाके फोडून आणि राजू शेट्टींवर फुलांची अन् गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरी केला.यापुढे आपला मोर्चा सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे वळवणार असल्याची घोषणा राजू शेट्टींनी केलीये.