गुलालानं माखलेल्या अंगानं राजू शेट्टी आईच्या भेटीला, थरथरत्या हातानं लेकाला लावला टिळा
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर राजू शेट्टींनी आईची भेट घेतली.आंदोलन स्थळावरून निघत राजू शेट्टींनी सर्वात आधी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.आईचे आशीर्वाद घेऊनच राजू शेट्टी यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती.गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या आई आजारी आहेत.आंदोलनात यश मिळाल्यानंतर आईनं आपल्या मुलाला हार घातला.