गणेशोत्सवानिमित्त कोल्हापूर पोलिसांकडून रूट मार्च, ३०० हून देखील अधिक पोलिसांची दंगल नियंत्रण प्रात्यक्षिके
बाप्पांचं आगमन अवघ्या काही तासांवर आलेलं असताना यंदाचा गणेशोत्सवही निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावा. यासाठी कोल्हापूर पोलीस सज्ज असून याचाच भाग म्हणून आज (१८ सप्टेंबर) कोल्हापूर पोलिसांनी शहरातून. रूट मार्च काढत संचलन केलं आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस आधीक्षक महेंद्र पंडितांच्या नेतृत्वाखाली ३० अधिकारी आणि ३०० पेक्षा अधिक पोलीस.. या रूट मार्चमध्ये सहभागी झाले. तसेच, रूटमार्च दरम्यान दंगल नियंत्रण पथकाची प्रात्यक्षिकंही यावेळी घेण्यात आली.
Curated by Shantanu Kulkarni|TimesXP Maharashtra|18 Sept 2023