आम्ही प्रचार केला तरी कुणी संजय मंडलिकांना मत देणार नाही, कोल्हापुरात महायुतीतील वाद चव्हाट्यावर
2062 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२०१९ च्या निवडणुकीत धनंजय महाडिकांच्या विरोधात आम्ही प्रचार केला ही आमची चूक झाली. निवडणुकीनंतर विद्यमान खासदार संजय मंडलिकांनी कुठल्याही गावाशी संपर्क ठेवला नाही. आता आम्ही सांगितलं तरी मंडलिकांना कोणीही मत देणार नाही अन् दगाफटका झाला तर...... भाजपने काम केलं नाही असा ठपका आमच्यावर नको म्हणून विद्यमान खासदार नको....... असं म्हणत भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कुपेकरांनी विद्यमान खासदारांना विरोध केला.यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटामधील जागा वाटपामधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे.