बंटी किंगमेकर, पण लढाईत उतरण्याची इच्छा नाही, कोल्हापूरसाठी मविआचा प्लॅन काय?
1124 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर.... पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा.... गेल्या काही वर्षांत जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपलं वर्चस्व ठेवलं... २०१९ नंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि आमदार महाविकास आघाडीचे झाल्याने भाजप जिल्ह्यात कमकुवत झाली होती. मात्र भाजपने धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी देत खासदार केलं. शिवाय शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर विद्यमान दोन्ही खासदार हे शिंदेंसोबत युतीमध्ये सामील झाले. त्यात अजितदादांच्या बंडानंतर हसन मुश्रीफ देखील महायुतीत सामील झाल्याने आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला लोकसभेसाठी उमेदवार शोधण्याची वेळ आलीये... असं असलं तरी तिन्ही पक्षाकडून मतदारसंघावर दावा ठोकण्यात आलाय. महायुतीकडून तगडी फिल्डिंग लागलेली असताना मविआचं कोल्हापुरात नेमकं काय होणार? लोकसभा उमेदवार कोण असणार? मविआचं नेमका प्लॅन काय असणार आहे? तेच या व्हिडीओत पाहू....