भाषणादरम्यान श्रीकांत शिंदे गहिवरले, मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिकांना अश्रू अनावर
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात श्रीकांत शिंदेंनी भाषण केलं.यावेळी श्रीकांत शिंदेंनी वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा संघर्ष मांडला.सुरुवातीच्या काळात घेतलेल्या मेहनतीच्या बळावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हणाले.जेव्हा मला विचारतात की, वडीलांसोबतची आठवण सांगा तर मला ती सांगता येत नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले.मी कायम एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांसोबतच पाहिले, आमच्यासोबत कधीही पाहिले नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले.मी म्हणायचो आम्हाला कधी वेळ देणार पण ते देऊ शकले नाहीत, असं म्हणत श्रीकांत शिंदेंना अश्रू अनावर झाले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांच्याही डोळ्यात पाणी आले.