कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांनाच उमेदवारी, समर्थकांकडून फटाक्याची आतिशबाजी
1059 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सात उमेदवार घोषित केले गेले. शाहू महाराजांचं नाव घोषित होताच समर्थकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके उडवले. समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. माध्यमांशी बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. जनतेची सेवा करण्यासाठी मला मिळालेली एक संधी आहे, असंही ते यावेळी म्हणाले.सर्वांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं ते म्हणाले आहेत.