पाणी साचल्यानं रुग्णवाहिका अडकली, रुग्णाला स्ट्रेचरवरून पाण्यातून ओढत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं
1743 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करागनबावडा तालुक्यात गेले चार ते पाच दिवस मुसळधार पावसानं हजेरी लावली. कुंभी नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर आल्यानं मांडुकली रस्ता पाण्याखाली गेला. दरम्यान आजारी वयोवृद्धांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवण्यासाठी स्ट्रेचरचा आधार घ्यावा लागला. १०८ च्या रुग्णवाहिकेमध्ये असणाऱ्या स्ट्रेचरच्या सहाय्याने त्यांना पाण्यातून आणण्यात आलं. रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलंय. दरम्यान गगनबावडा तहसिलदार डॉ शैलजा पाटील यांनी रत्यावरील पुराची पाहणी केली.