पोलीस भरतीला जातो सांगितलं आणि संसदेबाहेर कँडल स्मोक जाळले; अमोल शिंदेच्या बातमीनं आई-वडिलांना धक्का
5010 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंसदेवरील हल्ल्याला आज २२ पूर्ण होत असताना आजही असाच काहीसा प्रकार घडल्याने काही काळ देश हादरून गेला. लोकसभेत दोघा तरुणांनी घुसखोरी केली आणि नव्या संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर संसदेत आणि संसदेबाहेर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यातील एक तरुण हा लातूर जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातल्या झरी गावचा रहिवासी आहे. घरात बेताची परिस्थिती असलेला अमोल पोलीस भरतीची तयारी करत होता. क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल त्याच्या कौतुकाची बातमी वर्तमानपत्रातही आली होती. पण आजच्या घटनेनंतर अमोलच्या अटकेची बातमी कळल्यानं त्याच्या आई-वडिलांना जबर धक्का बसलाय.