पक्ष जबाबदारी देईल तिथं जाऊन मी उभा ठाकतो; लातूर शहर विधानसभेबद्दल संभाजी पाटील निलंगेकरांचं विधान
1031 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभारतीय जनता पार्टीत लोकांची आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. यामुळे, मला पक्षाने आदेश दिल्यास लातूर शहर विधानसभा मतदारसंघ यामधून निवडणूक लढवून निवडूनही येऊ शकतो, असा विश्वास भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी व्यक्त केला आहे. पक्षाने आदेश काढल्यास लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून नक्कीच निवडणूक लढवेन व मताधिक्याने निवडून येईन, असा विश्वास पाटील निलंगेकरांनी व्यक्त केला. संभाजी पाटील निलंगेकर हे आता नेमके कुठून लढणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.