मी गेल्यावरही लोकांनी तुझा सन्मान ठेवायला पाहिजे, सतेज पाटलांनी सांगितला विलासरावांसोबतचा किस्सा
1184 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करालातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला विलासराव देशमुख यांच्या कुटुंबासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी एक किस्सा सांगितला. पालकमंत्री असतानाचा किस्सा सांगत सतेज पाटील यांनी विलासरावांसोबच्या आठवणींना उजाळा दिला.