रविकांत तुपकरांचा सरकारला अल्टीमेटम, विविध मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला
1047 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम दिलाय.निराधारांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या १९ जानेवारीला...लातूर सह बुलढाण्यात रेल्वे रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.निराधारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी तसेच सोयाबीन, ऊस, कापूस..आदी शेतमालाला रास्त भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.शहरातील किल्ले मैदान येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले होते.मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.