सातवी पास रुक्मिणी पटसागळेची किमया, रुमा हस्तकारीच्या माध्यमातून महिलांना दिला रोजगार
1157 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासमोर दु:खाचा डोंगर उभा होता.. घरची परिस्थिती सावरण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात असणाऱ्या छोट्याश्या अनसरवाडी गावातील रुक्मिणी पटसागळे यांनी आपल्या कलेलाच हाताशी धरलं अन् व्यवसाय उभा केला.केवळ आठ हजार रुपयांपासून 10 बाय 10 च्या खोलीत रुमा हस्तकारी केंद्राला सुरुवात झाली. . जबाबदारीतून आलेले समाजभान त्यांना स्वस्थ बसू देईना त्यांनी महिला बचत गटाची स्थापना केली. त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अशिक्षित महिलांना धडे दिले आणि रोजगार निर्मिती केली. रुमा या हस्तकारी केंद्रात गावातील केवळ महिलाच काम करतात असं नाही तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन मुलीही ही कला आत्मसात करत आहेत.गावच्या गल्लीतून केवळ आठ हजार रुपयांपासून सुरु केलेला हा उद्योग आज सातासमुद्रापार पोहोचलाय आणि या माध्यमातून आज लाखोंची उलाढाल होतेय.