मुंबईतील दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले असून ते खात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल व त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त श्री. किशोर गांधी यांनी दिली आहे.