एका गाडीची किंमत २८ लाख तर दुसरीची १५ लाख, गावागावात प्रचारासाठी अजित पवार गटाची रणनीती
1319 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करातोंडावर आलेल्या निवडणुका... सभांचा धडाका आणि प्रत्येक मतदारसंघात सगळेच पक्ष तयारीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचीही जोरदार तयारी सुरु आहे... पक्षाच्या प्रचारासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या कार देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केली होती.. त्यानुसार दादा गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला टॉप गाडी देण्यात येणार आहे.. तब्बल ४० हून अधिक कार अजित पवार गटाकडून खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे... या गाड्या महिद्रा कंपनीच्या असणार आहेत. टेस्ट ड्राईव्हसाठी या महिंद्रा कंपनीच्या गाड्या पक्षाच्या कार्यालयात आणण्यात होत्या. ज्यातील बोलोरे निओ या गाडीची किंमत १५ लाख तर स्कॉरपिओ गाडीची किंमत ही २८ लाख आहे. ज्यांच्या किंमती ऐकल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा जोरदार सुरु झालेत....